पिकाचे अवशेष जाळल्यामुळे होणारे दुष्परिणाम
पिकाचे अवशेष जाळल्यामुळे होणारे दुष्परिणाम
संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व युनायटेड स्टेट कौन्सिलट जनरल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "पिकाचे अवशेष जाळल्यामुळे होणारे दुष्परिणाम "या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 28 व 29 डिसेंबर 2022. रोजी विज्ञान केंद्र सगरोळी येथे करण्यात आले होते. पिकाचे अवशेष जळल्यामुळे त्याचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर, जमिनीवर व निसर्गावर होतो याविषयी अवगत करण्यात आले. आपल्या भागामध्ये विशेषतः ऊस, भात व कापूस या पिकाची अवशेष मोठ्या प्रमाणात जाळली जातात. शेतकऱ्यांनी ते अवशेष न जाळता त्याचे योग्य पद्धतीने शेतामध्ये कुजवून सेंद्रिय खत निर्मिती करणे शक्य आहे. या दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषीभूषण शिवराम घोडके ,श्री विजय मेहत्रे, श्री नागेश यमेवार, प्रा. कपिल इंगळे, प्रा. व्यंकट शिंदे यांनी सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात पिकांच्या अवशेषापासून उत्कृष्ट दर्जाचे गांडूळ खत, कंपोस्ट खत निर्मिती प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच उकिरडा व्यवस्थापन यावर सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 60 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
Comments
Post a Comment