एक दिवशीय सेंद्रिय शेती परिषद

कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे हवामान अनुकूल शेती पद्धतीवर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी या प्रकल्प अंतर्गत एक दिवशीय सेंद्रिय शेती (विषमुक्त शेती ) या विषयावर सेंद्रिय परिषद संपन्न.


संस्कृती संवर्धन मंडळ व युनाइटेड स्टेट कौन्सिल जनरल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय सेंद्रिय शेती परिषद वार: रविवार, दि. 20 ऑगस्ट 2023, सेंद्रिय शेती विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषद दरम्यान सेंद्रिय शेतीचे महत्व व जागरूकता वाढविण्यासाठी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले. त्यामध्ये रानभाजी महोत्सव चा स्टॉल होता. त्यामध्ये विविध 18 प्रकारच्या रान भाजीचा समावेश होता. व तसेच कार्यक्रमाच्या दरम्यान डॉ. इंद्र मणी मिश्रा, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, यांनी दृकश्राव्य च्या माध्यमातून मार्गदर्शन केले व तसेच श्री दिलीप देशमुख बारडकर ( सेंद्रिय शेतीतज्ञ ), भाऊसाहेब बऱ्हाटे ( जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड ), यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्राबाई कमलवाड(सेंद्रिय शेती तज्ञ ) चिंचाळा ता. बिलोली या महिलेने सेंद्रिय शेतीचे वर मनोगत व्यक्त केले व तसेच शेतकऱ्यांची असलेल्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली.
 


One day conference on "Organic Farming” was conducted at Udyamita Learning Centre, Krishi Vigyan Kendra Sagroli. The Conference was organized on August 20, 2023, as part of the project titled "Capacity building of farmers on climate smart agriculture." The project is ongoing and is being carried out in association with Sanskrit Samvardhan Mandal, Krishi Vigyan Kendra, Sagroli, and The United States Consulate General Mumbai. The project aims to promote exposure to climate smart agricultural practices and build positive attitude of farmers towards it.
During the conference, for increasing importance and awareness about organic farming we build various stall. It had vegetable festival stall. It included 18 types of wild vegetables (Ranbhaji). Also during the program Dr. Indra Mani Mishra, Vice- Chancellor Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani guided the farmer on online mode. Also Mr. Dilip Deshmukh Bardkar (Organic farming expert) they told about the soil health, soil life, benefits of organic manure like farm yard manure( FYM), vermi compost, NADEP compost, poultry manure also organic input like Nimboli ark, Darshapani ark, Jivamrut and Amrutpani. Bhausaheb Barhate (District Superintendent Agriculture officer Nanded), they were guided on the need and scope of organic farming in future and current status of organic farming in India. Also one of innovative lady farmer Miss Chandrabai Kamalwad (Organic agriculture specialist) chinchala Tq. Biloli dist. Nanded shares her work experiences to the farmer. She presenting 18 wild vegetable (Ranbhaji) and told the importance and nutrient containing in the vegetable and having 15 years of experience in the organic farming.

#farmers #workshop #US #Consulate #climatechangeaction #USConsulateGeneral #mumbai #support #kvksagroli #nanded #farming #trainingday #climatechange #agriculture U.S. Consulate General Mumbai

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय शेती बाबत महत्व आणि जागरूकता शेतकऱ्यांमध्ये व्हावी याच उद्देश्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची क्षमता बांधणी आणि आत्मविश्वास वाढावा या करिता अभ्यास सहलीचे आयोजन

शाश्वत शेती पद्धती या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण…

नाडेप खत आणि गांडूळ खत निर्मिती पद्धत हे कशाप्रकारे करायचे यावर एक दिवसीय प्रात्यक्षिकाचे आयोजन..