जैविक कीटकनाशकांची निर्मिती आणि वापर


जैविक कीटकनाशकांची निर्मिती आणि वापर


संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व युनायटेड स्टेट कौन्सिल जनरल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने" जैविक कीटकनाशकांची निर्मिती आणि वापर" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन दि.16 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते. त्यामध्ये जैविक कीटकनाशकाची निर्मिती आणि वापर कशाप्रकारे करायचे याचे तंत्रज्ञान सांगण्यात आले. कार्यशाळेच्या दरम्यान निंबोळी अर्क, अझाडी रॅकटिंग, व्हर्टिसिलियम आणि बिव्हेरिया बेसियाना. यासारखी जैविक कीटकनाशके याची निर्मिती आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून शेतकऱ्यांना शेतावर कसे करता येते याची प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यासोबतच या सगळ्यांचा वापर कशाप्रकारे करायचा व कशासाठी होतो याबद्दल डॉ. कृष्णा अंभुरे ( विषय विशेषज्ञ - पीक संरक्षण )यांनी मार्गदर्शन केले . आपण कमी खर्चामध्ये गुणवत्ता पूर्ण जैविक कीटकनाशके व जैविक खते तयार करू शकतो तसेच शेतकरी गटांना मोठ्या प्रमाणावर याची निर्मिती करून इतर शेतकऱ्यांना ही ती उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मोठ्या प्रमाणात खर्चाची बचत होऊन विषमुक्त अन्नधान्य निर्मिती होऊ होऊ शकते व पर्यावरणाचे संतुलन व्यवस्थित राहील असे ते म्हणाले व तसेच सेंद्रिय प्रक्षेत्र ला भेट देण्यात आली. #farmers #workshop #US #Consulate #climatechangeaction #USConsulateGeneral #mumbai #support #kvksagroli #nanded #farming #trainingday #climatechange #agriculture U.S. Consulate General Mumbai










 

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय शेती बाबत महत्व आणि जागरूकता शेतकऱ्यांमध्ये व्हावी याच उद्देश्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची क्षमता बांधणी आणि आत्मविश्वास वाढावा या करिता अभ्यास सहलीचे आयोजन

शाश्वत शेती पद्धती या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण…

नाडेप खत आणि गांडूळ खत निर्मिती पद्धत हे कशाप्रकारे करायचे यावर एक दिवसीय प्रात्यक्षिकाचे आयोजन..