हवामान अनुकूल शेती प्रकल्पांतर्गत शेतकरी सहल
यु एस कौन्सलेट जनरल मुंबई व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या "हवामान अनुकूल शेती" प्रकल्पांतर्गत दोन दिवसीय शेतकरी सहलीचे आयोजन दि.30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्याचे व शेतकरी गटाचे प्रतिनिधी, प्रयोगशील शेतकरी यांच्यातून 60 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.या शेतकऱ्यांना या प्रकल्पांतर्गत वर्षभर विविध विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून या कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब केलेल्या कडवंची व वानडगाव या जालना जिल्ह्यातील दोन गावांना शेतकऱ्यांची सहल आयोजित करण्यात आली होती हवामान अनुकूल तंत्रज्ञानात एकात्मिक शेती पद्धती, शेततळे व मत्स्यपालन, फळबाग लागवड विशेषतः सिताफळ, पेरू, द्राक्ष व डाळिंब, रेशीम शेती, बांबू लागवड, कुक्कुटपालन, उस्मानाबादी शेळी पालन व जलसंधारणाच्या विविध उपचार पद्धतीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यास दौऱ्या दरम्यान कृषी विज्ञान केंद्र जालना येथील प्रक्षेत्र व विविध प्रकल्प या भेटीदरम्यान शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती मराठवाडा शेती सहाय्य मंडळ कृषी विज्ञान केंद्र जालना येथील प्रमुख डॉ.श्रीकृष्ण सोनूने व इंजी.पंडित वासरे यांनी माहिती दिली या सहलीत कृषी विज्ञान केंद्र सगरोळी कडून प्रा.व्यंकट शिंदे प्रा.कपिल इंगळे,तुकाराम मंत्रे, संतोष उलगडे,माधव राजुरे व श्रीनिवास वाघमारे यांनी सहभाग घेतला. #USConsulateGeneral #mumbai #support #kvksagroli #nanded #farmer #training #tour #Climate #friendly #agriculture
A two-day farmers exposure visit to climate-smart Villages was organized on 30th Nov and 1 Dec under the project "Climate Smart Agriculture " sponsored by US Consulate General Mumbai. Under this project, 60 farmers have been selected from various farmers producing companies and representatives of farmer groups, experimental farmers in the Nanded district.
exposer visit was organized to two villages of Jalna district, Kadavanchi, and Wandgaon, which have adopted climate-friendly technologies. Various treatment methods of watershed, bamboo cultivation, poultry farming, Osmanabadi goat rearing, and water conservation were studied. During this exposure visit the field and various projects of KVK Jalna were also visited. Dr. Shrikrishna Sonune Head of KVK Jalna and Engg.Pandit Vasare guided farmers during the visit. SSMKVK staff Prof. Venkat Shinde Prof. Kapil Ingle, Tukaram Mantre, Santosh Ulgade, Madhav Rajure, and Srinivas Waghmare along with 60 farmers participated in the exposure visit.
Comments
Post a Comment