Posts

सेंद्रिय शेती बाबत महत्व आणि जागरूकता शेतकऱ्यांमध्ये व्हावी याच उद्देश्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची क्षमता बांधणी आणि आत्मविश्वास वाढावा या करिता अभ्यास सहलीचे आयोजन

Image
सेंद्रिय शेती बाबत महत्व आणि जागरूकता शेतकऱ्यांमध्ये व्हावी याच उद्देश्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची क्षमता बांधणी आणि आत्मविश्वास वाढावा या करिता अभ्यास सहलीचे आयोजन हवामान बदलांचा पिकावर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाय योजना आणि तसेच रासायनिक खते व किटकनाशके यांचा अतिवापर यामुळे जमिनीचे आरोग्य व तसेच मानवी आरोग्यावर होणार परिणाम आणि त्यावरील उपाय योजना या विषयी हवामान अनुकल शेती पद्धतीवर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ६० शेतकऱ्यांच्या अभ्यास सहलीचे आयोजन संस्कृति संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या तर्फे महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी येथे दोन दिवसीय दि. १० ते ११ ऑक्टोबर २०२३ दरम्यान अभ्यास सहल आयोजित करण्यात आली. या अभ्यास सहली दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी प्रक्षेत्रा वरील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि निविष्ठा निर्मिती केंद्र, भाजीपाला-फुलशेती-फळबाग रोपवाटिका आणि म्युजियम, ड्रोन lab, एकात्मिक शेती पद्धत, ज्वारी सुधार प्रकल्प, कृषी अवजारे बँक, Biogas, polyhouse मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हळद आणि शेवगा ...

एक दिवशीय सेंद्रिय शेती परिषद

Image
कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे हवामान अनुकूल शेती पद्धतीवर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी या प्रकल्प अंतर्गत एक दिवशीय सेंद्रिय शेती (विषमुक्त शेती ) या विषयावर सेंद्रिय परिषद संपन्न. संस्कृती संवर्धन मंडळ व युनाइटेड स्टेट कौन्सिल जनरल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय सेंद्रिय शेती परिषद वार: रविवार, दि. 20 ऑगस्ट 2023, सेंद्रिय शेती विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषद दरम्यान सेंद्रिय शेतीचे महत्व व जागरूकता वाढविण्यासाठी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले. त्यामध्ये रानभाजी महोत्सव चा स्टॉल होता. त्यामध्ये विविध 18 प्रकारच्या रान भाजीचा समावेश होता. व तसेच कार्यक्रमाच्या दरम्यान डॉ. इंद्र मणी मिश्रा, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, यांनी दृकश्राव्य च्या माध्यमातून मार्गदर्शन केले व तसेच श्री दिलीप देशमुख बारडकर ( सेंद्रिय शेतीतज्ञ ), भाऊसाहेब बऱ्हाटे ( जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड ), यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्राबाई कमलवाड(सेंद्रिय शेती तज्ञ ) चिंचाळा ता. बिलोली या महिलेने सेंद्रिय शेतीचे वर मनोगत व्यक्त केले व तसेच शेतकऱ्यांची असलेल...

जैविक कीटकनाशकांची निर्मिती आणि वापर

Image
जैविक कीटकनाशकांची निर्मिती आणि वापर संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व युनायटेड स्टेट कौन्सिल जनरल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने" जैविक कीटकनाशकांची निर्मिती आणि वापर" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन दि.16 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते. त्यामध्ये जैविक कीटकनाशकाची निर्मिती आणि वापर कशाप्रकारे करायचे याचे तंत्रज्ञान सांगण्यात आले. कार्यशाळेच्या दरम्यान निंबोळी अर्क, अझाडी रॅकटिंग, व्हर्टिसिलियम आणि बिव्हेरिया बेसियाना. यासारखी जैविक कीटकनाशके याची निर्मिती आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून शेतकऱ्यांना शेतावर कसे करता येते याची प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यासोबतच या सगळ्यांचा वापर कशाप्रकारे करायचा व कशासाठी होतो याबद्दल डॉ. कृष्णा अंभुरे ( विषय विशेषज्ञ - पीक संरक्षण )यांनी मार्गदर्शन केले . आपण कमी खर्चामध्ये गुणवत्ता पूर्ण जैविक कीटकनाशके व जैविक खते तयार करू शकतो तसेच शेतकरी गटांना मोठ्या प्रमाणावर याची निर्मिती करून इतर शेतकऱ्यांना ही ती उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मोठ्या प्रमाणात खर्चाची बचत ...

शेतीतील उपजीविका या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा 28 जून 2023 रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न.

Image
शेतीतील उपजीविका  या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा 28 जून 2023 रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न. संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र , सगरोळी व युनायटेड स्टेट्स कौन्सिल जनरल मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने “शेतीमधील उपजीविका( कुकुटपालन, दुग्धव्यवसाय ) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा सत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यशाळेच्या कार्यक्रमात विविध प्रकारचे कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, शेड बांधणे, दिवसा ढवळ्या पिलांचे संगोपन, खाद्य आणि पाणी व्यवस्थापन, रोग, लक्षणे आणि लसीकरण या विषयांचा समावेश होता. कार्यशाळेच्या कार्यक्रमा दरम्यान, शेतकर्‍यांना कुक्कुटपालन हा पशुपालनाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये कोंबडी, बदके, टर्की आणि गुससारखे पाळीव पक्षी अन्नासाठी मांस किंवा अंडी तयार करण्यासाठी वाढवतात. कुक्कुटपालन मुख्यतः कोंबडीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. दरवर्षी 60 अब्ज पेक्षा जास्त कोंबड्या खाण्यासाठी मारल्या जातात. मुख्य चार प्रकारचे मोठे चिकन फार्म आहेत; पुलेट फार्म्स जे कोंबडी वाढवतात ते लेयर फार्म किंवा ब्रीडर फार्ममध्ये पाठवतात, ब्रॉयलर फार्म जे मांसासाठी कोंबडी वाढवतात आणि...

आपल्या शेतावरच जैविक खते व जैविक औषधी तयार करण्याचे तंत्रज्ञान शेतकर्यांनी आत्मसात करावे

Image
  आपल्या शेतावरच जैविक खते व जैविक औषधी तयार करण्याचे तंत्रज्ञान शेतकर्यांनी आत्मसात करावे आपल्या शेतावरच जैविक खते व जैविक औषधी तयार करण्याचे तंत्रज्ञान शेतकर्यांनी आत्मसात करावे. जैविक खते निर्मिती व वापर या विषयीची एक दिवसीय कार्यशाळा उद्यमिता लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न. संस्कृती सवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी व युनायटेड स्टेट कौन्सलेट जनरल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "हवामान अनुकूल शेती पद्धतीवर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी" हा प्रकल्प चालू असून या प्रकल्पा अंतर्गत पर्यावरण पूरक शाश्वत शेती पद्धतीना प्रोत्साहन देणे व हवामान बदलाची अनुकूलता वाढवण्यासाठी सेंद्रीय शेती,वातावरणातील प्रदुर्षण कमी करण्या सारख्या विषयावर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करण्या साठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून "जैविक खतांची निर्मिती आणि वापर" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. 19 जून 2023 रोजी करण्यात आले होते.या मधे राईझोबियम,पी एस बी, आझोस्पिरीलीयम,सारखी जिवाणू खते,ट्रायकोडर्मा,सुडोमोनास मायकोरायझा सारखी बुरशीनाशके मेटारायज...