आपल्या शेतावरच जैविक खते व जैविक औषधी तयार करण्याचे तंत्रज्ञान शेतकर्यांनी आत्मसात करावे

 आपल्या शेतावरच जैविक खते व जैविक औषधी तयार करण्याचे तंत्रज्ञान शेतकर्यांनी आत्मसात करावे


आपल्या शेतावरच जैविक खते व जैविक औषधी तयार करण्याचे तंत्रज्ञान शेतकर्यांनी आत्मसात करावे. जैविक खते निर्मिती व वापर या विषयीची एक दिवसीय कार्यशाळा उद्यमिता लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न.
संस्कृती सवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी व युनायटेड स्टेट कौन्सलेट जनरल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "हवामान अनुकूल शेती पद्धतीवर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी" हा प्रकल्प चालू असून
या प्रकल्पा अंतर्गत पर्यावरण पूरक शाश्वत शेती पद्धतीना प्रोत्साहन देणे व हवामान बदलाची अनुकूलता वाढवण्यासाठी सेंद्रीय शेती,वातावरणातील प्रदुर्षण कमी करण्या सारख्या विषयावर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करण्या साठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून "जैविक खतांची निर्मिती आणि वापर" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. 19 जून 2023 रोजी करण्यात आले होते.या मधे राईझोबियम,पी एस बी, आझोस्पिरीलीयम,सारखी जिवाणू खते,ट्रायकोडर्मा,सुडोमोनास मायकोरायझा सारखी बुरशीनाशके मेटारायजियम,बिव्हेरिया, व्हर्टिसिलियम सारखी जैविक कीटकनाशके याची निर्मिती आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून शेतकऱ्यांच्या शेतावर कशी करता येते याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले यासोबतच या सगळ्यांचा वापर व उपयोग कशासाठी होतो याचे मार्गदर्शन श्री महेश जाधव तंत्रज्ञान समन्वयक (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, बुलढाणा) यांनी केले. आपण कमी खर्चामध्ये गुणवत्ता पूर्ण जैविक खते व जैविक बुरशीनाशके तयार करू शकतो तसेच शेतकरी गटांनी मोठ्या प्रमाणावर याची निर्मिती करून इतर शेतकऱ्यांनाही ते उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले, या मुळे मोठ्या प्रमाणात खर्चाची बचत होऊन विषमुक्त अन्नधान्य निर्मिती होऊन पर्यावरणाचे संतुलन व्यवस्थित राहील असे ते म्हणाले.या कार्यक्रमात सोयाबीन उत्पादन वाढीची पंचसूत्री व जैविक खतांचा सोयाबीन लागवडी मधील वापर व महत्त्व या विषयी प्रा.व्यंकट शिंदे यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेसाठी 62 शेतकऱ्यांची उपस्थिती होते. #farmer #USConsulate #climatechangeaction #stubbleburning #USConsulateGeneral #mumbai #support #kvksagroli #nanded #farmers #trainingday #climatechange #friendly #agriculture U.S. Consulate General Mumbai @usconsulategeneralmumbai


Farmer should adopt the technology of making bio-fertilizer and biological fungicide, pesticides on their own farm. One day workshop on “Production and use of bio- fertilizer” was conducted at udyamita learning center krishi vigyan Kendra sagroli . The project titled “capacity building of farmers on climate smart agriculture” in association with Sanskrit savardhan mandal, krishi vigyan sagroli and united states consulate general Mumbai is ongoing and under this project, promotion of sustainable farming methods that complement the environment and to increase adaptability to climate change , organic farming , environmental  pollution  various activities are being undertaken to build the capacity of farmers on issues like  reduction gases.   As the part of project one day workshop on “production and use of bio- fertilizer “was organized on June 19, 2023.in the workshop, using the available accessories bacterial fertilizer likes Rhizobium, PSB, and Azospirillium. Biological fungicides like Trichodrama, pseudomonas, mycorhiza, and   biological pesticides like metarhizium, biveria, verticillium, how can be produced on the farmer fields along with demonstration.  The use and purpose of all bio –fertilizer were guided by Mr. Mahesh Jadhav, Technology coordinator (Nanaji Deshmukh krishi sanjeevani project, Buldhana). He told that we can produce quality bio- fertilizer and biological fungicides at low cost and it is necessary for farmers groups to produce these on a large scale and make them available to other farming. In this program, prof. venkat shinde guided about the technology of soybean production and use and Importance of biological fertilizer in soybean cultivation, 62 farmers were attended the workshop.





Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय शेती बाबत महत्व आणि जागरूकता शेतकऱ्यांमध्ये व्हावी याच उद्देश्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची क्षमता बांधणी आणि आत्मविश्वास वाढावा या करिता अभ्यास सहलीचे आयोजन

शाश्वत शेती पद्धती या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण…

नाडेप खत आणि गांडूळ खत निर्मिती पद्धत हे कशाप्रकारे करायचे यावर एक दिवसीय प्रात्यक्षिकाचे आयोजन..