शाश्वत शेती पद्धती या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण…

 शाश्वत शेती पद्धती या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण…



प्रा. कपिल इंगळे यांनी माती व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे व कोणती सेंद्रिय निविष्ठा वापरली जावी, जसे की अमृतपाणी, गोकृपा अमृत, पंचगव्या, जीवामृत, कंपोस्ट आणि हिरवळचे खते वापरावे हे त्यांनी मार्गदर्शना मध्ये सांगितले. ज्या शेतीवर अन्न पिके चांगल्या प्रकारे घेऊ शकत नाही, त्या शेतीवरआपण बांबूचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकते असे प्रा. व्यंकट शिंदे यांनी यावर मार्गदर्शन केले. एकात्मिक शेती पद्धत आणि तंतोतंत शेती पद्धत या मध्ये कोणते तंत्रज्ञान वापरले जाते याची माहिती डॉ.संतोष चव्हाण यांनी सांगितली. पिकाची फेरपालट केल्याने आणि आंतर पिकामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादनात वाढ होते असे प्रा. कपिल इंगळे यांनी सांगितले. एकात्मिक कीड व्यवस्थापन साठी निंबोळी अर्क, लमित, पक्षी थांबे, चिकट सापळा आणि प्रकाश सापळा याचा वापर केल्यावर कीटकावर नियंत्रण ठेवू शकतो असे डॉ. कृष्णा अंभोरे यांनी सांगितले. शेती पद्धतीच्या अभ्यासासाठी शेतकऱ्यांना प्रा. कपिल इंगळे,(शास्त्रज्ञ) कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांनी
लिहिलेले दोन पुस्तके देण्यात आली .त्यामध्ये "सेंद्रिय शेती निविष्ठा निर्मिती व वापर" आणि "गळीत धान्य पिके लागवड व पीक संरक्षण तंत्रज्ञान". संस्कृती सवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व युनायटेड स्टेट कौन्सलेट जनरल मुंबई यांच्या संयुक्त विदयमानाने दोन दिवसीय प्रशिक्षणाचे कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे आयोजन करण्यात आले होते. #rural #organic #food #farmer #books #agriculture #kvksagroli #nanded #maharashtra #natural #farming






Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय शेती बाबत महत्व आणि जागरूकता शेतकऱ्यांमध्ये व्हावी याच उद्देश्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची क्षमता बांधणी आणि आत्मविश्वास वाढावा या करिता अभ्यास सहलीचे आयोजन

नाडेप खत आणि गांडूळ खत निर्मिती पद्धत हे कशाप्रकारे करायचे यावर एक दिवसीय प्रात्यक्षिकाचे आयोजन..