एक दिवशीय सेंद्रिय शेती परिषद
कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे हवामान अनुकूल शेती पद्धतीवर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी या प्रकल्प अंतर्गत एक दिवशीय सेंद्रिय शेती (विषमुक्त शेती ) या विषयावर सेंद्रिय परिषद संपन्न. संस्कृती संवर्धन मंडळ व युनाइटेड स्टेट कौन्सिल जनरल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय सेंद्रिय शेती परिषद वार: रविवार, दि. 20 ऑगस्ट 2023, सेंद्रिय शेती विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषद दरम्यान सेंद्रिय शेतीचे महत्व व जागरूकता वाढविण्यासाठी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले. त्यामध्ये रानभाजी महोत्सव चा स्टॉल होता. त्यामध्ये विविध 18 प्रकारच्या रान भाजीचा समावेश होता. व तसेच कार्यक्रमाच्या दरम्यान डॉ. इंद्र मणी मिश्रा, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, यांनी दृकश्राव्य च्या माध्यमातून मार्गदर्शन केले व तसेच श्री दिलीप देशमुख बारडकर ( सेंद्रिय शेतीतज्ञ ), भाऊसाहेब बऱ्हाटे ( जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड ), यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्राबाई कमलवाड(सेंद्रिय शेती तज्ञ ) चिंचाळा ता. बिलोली या महिलेने सेंद्रिय शेतीचे वर मनोगत व्यक्त केले व तसेच शेतकऱ्यांची असलेल...