आपल्या शेतावरच जैविक खते व जैविक औषधी तयार करण्याचे तंत्रज्ञान शेतकर्यांनी आत्मसात करावे
आपल्या शेतावरच जैविक खते व जैविक औषधी तयार करण्याचे तंत्रज्ञान शेतकर्यांनी आत्मसात करावे आपल्या शेतावरच जैविक खते व जैविक औषधी तयार करण्याचे तंत्रज्ञान शेतकर्यांनी आत्मसात करावे. जैविक खते निर्मिती व वापर या विषयीची एक दिवसीय कार्यशाळा उद्यमिता लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न. संस्कृती सवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी व युनायटेड स्टेट कौन्सलेट जनरल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "हवामान अनुकूल शेती पद्धतीवर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी" हा प्रकल्प चालू असून या प्रकल्पा अंतर्गत पर्यावरण पूरक शाश्वत शेती पद्धतीना प्रोत्साहन देणे व हवामान बदलाची अनुकूलता वाढवण्यासाठी सेंद्रीय शेती,वातावरणातील प्रदुर्षण कमी करण्या सारख्या विषयावर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करण्या साठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून "जैविक खतांची निर्मिती आणि वापर" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. 19 जून 2023 रोजी करण्यात आले होते.या मधे राईझोबियम,पी एस बी, आझोस्पिरीलीयम,सारखी जिवाणू खते,ट्रायकोडर्मा,सुडोमोनास मायकोरायझा सारखी बुरशीनाशके मेटारायज...